‘ईद ए मिलाद’निमित्त दोनच मिरवणुकांना परवानगी

करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नियमाच्या अनुषंगाने ‘ईद ए मिलाद’साठी मुंबई व उपनगरांत एकेक मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई : ‘ईद ए मिलाद’निमित्त मंगळवारी मुंबईत केवळ दोन मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी दिली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नियमाच्या अनुषंगाने ‘ईद ए मिलाद’साठी मुंबई व उपनगरांत एकेक मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. या दोन्ही मिरवणुकीमध्ये प्रत्येकी पाच ट्रक व प्रत्येक ट्रकमध्ये पाच नागरकिांना परवानगी देण्यात आली आहे. यावेळी मिरवणुकीत उपस्थित नागरिकांना करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे. मुंबईत ‘ईद’च्या पार्श्वभूमीवर इतर मिरवणुकीस बंदी घालण्यात आल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Eid e milad only two processions are allowed akp

ताज्या बातम्या