मुंबई : शिवसेनेचे मुख्य नेता व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला गेल्याने राज्यात तर्कविर्तकांना उधाण आले. राज्यातील खासदारांचे दिल्लीतील प्रश्न सोडविण्यासाठी शिंदे दिल्लीला गेल्याचे स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. या भेटीत ते अमित शहा यांना भेटणार असल्याचे समजते. येत्या काळात सर्वाच्च न्यायालयात शिवसेना चिन्ह आणि नावाबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे. त्या संर्दभात शिंदे जेष्ठ विधी तज्ञांच्या भेटी घेणार आहेत.
दिल्लीत पक्षाच्या खासदार व काही राज्य प्रमुखांना भेटणार आहेत. अधिवेशन काळात शिंदे आपल्या खासदारासह केंद्रीय मंत्र्यांना तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांना भेटणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
शिंदे पक्षाचे नेते ही भेट खासदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी गेल्याचे सांगत असले तरी ही दिल्लीवारी राजकीय तसेच न्यायालयीन लढाईच्या पार्श्वभूमीवर असल्याचे समजते.