मुंबई: जोगेश्वरीत राहणाऱ्या एका वृध्दाचा अनैसर्गिक अत्याचार केल्यामुळे मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी हलगर्जीपणा केल्यामुळे उपचाराला विलंब होऊन मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

पिडीत वृद्ध (७७) हे गोरेगावच्या नेस्को कॉलनीत राहात होते. ते शुक्रवारी मालवण येथील गावी जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्या मुलांने त्यांना २ हजार रुपये दिले होते. त्याच रात्री जोगेश्वरीच्या बांदेकर वाडी येथे राहणाऱ्या सचिन महागावकर (४०) हा परिचित त्यांना रस्त्यात भेटला. त्याने घरी कुणी नसल्याचे सांगून पिडीत वृद्धाला मद्य प्राशन करण्यासाठी नेले.

त्यावेळी आरोपीने वृद्धाकडील २ हजार रुपये काढून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. स्थानिकांनी जखमी वृद्धाला कुपर रूग्णालयात दाखल केले. तेथे सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जोगेश्वरी पोलिसांनी आरोपी सचिन महागावकर याला अटक केली असून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा कुटुंबियांचा आरोप

स्थानिक मल्हार दिक्षित, अक्षय पोकळे आदी तरूणांनी जखमी वृद्ध व्यक्तीला आधी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांनी जबाब घेण्यास आणि तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे ४ तासांचा विलंब झाला असा आरोप मल्हार दिक्षित याने केले आहे. जोगेश्वरी पोलिसांनी मात्र हे आऱोप फेटाळले आहेत. नियमानुसार जबाब घेऊन गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.