बेस्ट उपक्रमाने अपंग प्रवाशांना मिळत असलेले सवलतीचे ओळखपत्र किंवा कागदी ओळखपत्र बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अपंग प्रवाशांना स्मार्ट कार्ड देण्यात येत असून त्यासाठी १५ सप्टेंबर अंतिम मुदत दिली आहे. ही मुदत दिल्यानंतर २५ हजाराहून अधिक दिव्यांग प्रवाशांनी स्मार्ट कार्ड घेतले आहे. मात्र, बहुतांश दिव्यांग प्रवाशांकडे स्मार्ट फोन नसल्याने घरपोच सेवेचाही लाभ घेतला आहे.

डिजिटल तिकीट सेवेला चालना देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने बेस्ट चलो अँप, स्मार्ट कार्ड, बसपास, एनसीएमसी कार्ड बसपास योजना सुरू केल्या. या सेवेनंतर उपक्रमाने अपंग प्रवाशांना देण्यात येणारे सवलतीचे ओळखपत्र किंवा कागदी ओळखपत्र बदलण्याचा निर्णय घेतला असून त्याऐवजी स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहेत. विशेष सवलतीसाठी अपंग प्रवाशांनी बेस्ट चलो अँप डाउनलोड करून बसपासच्या मान्यतेकरिता ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ज्या अपंग प्रवाशांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नाही, परंतु त्यांना स्मार्ट कार्ड हवे आहे, त्यांचासाठी स्मार्ट कार्ड घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ऑगस्टमध्ये घरविक्रीत घट ; मुंबईत ८५५२ घरांची विक्री

या योजनेची २४ ऑगस्ट २०२२ ला याची घोषणा केल्यानंतर २५ हजार ६१५ अपंग प्रवाशांनी स्मार्ट कार्ड घेतले आहे. यापैकी ११ हजार १९ अपंगांकडे स्मार्ट फोन नसल्याने त्यांनी घरपोच स्मार्ट कार्ड सेवेचा लाभ घेतला आहे. तर स्मार्ट कार्ड असलेल्या १४ हजार ५९६ जणांनी मोबाईल अँपवर ही सुविधा घेतली आहे.

गणेशोत्सवानिमित्ताने मुंबई पोलिसांचं भन्नाट गाणं; देवेंद्र फडणवीसांनीच केलं शेअर; पाहा गाण्याचा Video

टोल फ्री क्रमांक उपलब्ध

बेस्टच्या कॉल सेंटरकडून विशेष सवलतीच्या पासधारकांना कॉल केले जात आहेत. जे स्मार्ट कार्ड घेण्यास इच्छुक आहेत त्यांना त्यांचा पत्त्यावर कार्ड पाठवले जात आहे. त्यासाठी बेस्ट उपक्रमाने 1800227550 हा टोल फ्री क्रमांक किंवा 022-24190117 क्रमांक असलेले कॉल सेंटर 24 तास सुरू ठेवले आहेत. बेस्ट चलो अँपद्वारे जुने कार्ड बदलून नवीन स्मार्ट कार्ड घ्यावे, अन्यथा 15 सप्टेंबर 2022 पासून जुने बसपास अवैध ठरविले जातील, असे उपक्रमाने स्पष्ट केले आहे.