काळाचौकी परिसरातील अभ्युदय नगरमधील मिलान इंडस्ट्रीयल इस्टेट येथे एका इमारतीला आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.१५ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवले. आगीच्या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही.
Mumbai: A level-II fire has broken out at Milan Industrial Estate, Abhyudaya Nagar in Kala Chowky locality. 5 fire tenders, one ambulance, one Quick Response Vehicle is present at the spot. More details awaited. pic.twitter.com/LEy15Dx6XJ
— ANI (@ANI) February 7, 2020
मिलान इंडस्ट्रीयल इस्टेट या सहामजली इमारतीत प्रत्येक मजल्यावर २६ गाळे आहेत. इथे अनेक व्यवसाय चालतात. रात्री ११.१५ च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठे नुकसान टळले.