वाकोला पोलीस ठाण्यात गोळीबाराची घटना ताजी असताना सोमवारी रात्री गोवंडी पोलीस ठाण्यात अचानक गोळीबारीचा आवाज झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र एक पोलीस अधिकारी आपले रिव्हॉल्वर तपासत असताना चुकून गोळी सुटल्याचे नंतर लक्षात आले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेर गोवंडी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री रात्रपाळीसाठी आले होते. रात्री ८ च्या सुमारास त्यांनी गणवेष बदलला आणि आपले रिव्हॉल्वर तपासायला घेतले. त्यावेळी चुकून एक गोळी सुटली. त्या आवाजाने सारे जण हादरले आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. या दुर्घटनेत कुणी जखमी झाले नाही. चुकून गोळी सुटल्याचे तपासात निष्पन्न झाले असून तशी नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2015 रोजी प्रकाशित
गोवंडी पोलीस ठाण्यात चुकून गोळीबार
वाकोला पोलीस ठाण्यात गोळीबाराची घटना ताजी असताना सोमवारी रात्री गोवंडी पोलीस ठाण्यात अचानक गोळीबारीचा आवाज झाल्याने खळबळ उडाली होती.
First published on: 07-07-2015 at 02:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firing accidentally in govandi police station