मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्याच्या मुंबई पोलिसांच्या अर्जाला परवानगी दिली आहे. परमबीर सिंग व रिजाय भाटी आणि विनय सिंग यांना फरार घोषित करण्यात आलं आहे.

तर, परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आल्यानंतर आता त्यांना ३० दिवसांची मुदत दिली जाणार आहे. या कालावधीत परमबीर सिंग जर न्यायायलयासमोर हजर झाले नाही तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे.

मुंबईच्या किल्ला कोर्टाने परमबीर सिंग यांना फरार घोषित केलं आहे. गोरेगावच्या एका प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात अनेक समन्स काढले होते, मात्र त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर झाले नव्हते. आता न्यायालयाने परमबीर सिंग यांच्यासह रिजाय भाटी आणि विनय सिंग यांना देखील फरार घोषित केलं आहे.

गोरेगाव खंडणी प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गुन्हेगार घोषित करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने कोर्टात अर्ज दाखल केला होता. विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी मुंबईच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात अर्ज दाखल करून सिंग व्यतिरिक्त रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू या इतर दोन आरोपींना गुन्हेगार घोषित करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.

परमबीर सिंग यांना गुन्हेगार घोषित करा; गुन्हे शाखेची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जगताप म्हणाले होते की, “आमच्याकडे आधीच आरोपींविरुद्ध तीन अजामीनपात्र वॉरंट आहेत, त्यामुळे आम्ही आरोपीला घोषित गुन्हेगार घोषित करण्यासाठी हा अर्ज करत आहोत.” याचबरोबर, जगताप यांनी दाखल केलेल्या अर्जात असे म्हटले आहे की, “अजामीनपात्र वॉरंट जारी करूनही आरोपी अद्याप समोर आलेले नाही आणि ते बेपत्ता आहेत, जसे तपासातून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांना गुन्हेगार घोषित केले जावे.”