लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेत नोकरी करत असताना भारतात प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नाशिक येथील गौरव कायंदे पाटील याला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाले आहे.

गौरवचे दहावी पर्यंतचे शिक्षण सिल्व्हर ओक हायस्कूल नाशिक येथे झाले. त्यानंतर अभियांत्रिकीची पदवी पुण्याच्या सिंहगड संस्थेतून पूर्ण केले. त्यानंतर अमेरिकन कंपनी टीबकोमध्ये नोकरी करत असताना त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून एम ए (लोक प्रशासन) ही पदवी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. पुढे, यूपीएससीची तयारी कारण्यासाठी दिल्लीत जाऊन अभ्यास सुरू केला आणि चौथ्या प्रयत्नात गौरव यशस्वी झाला.

आणखी वाचा-चहाच्या टपरीवर काम ते शासकीय अधिकारी, मंगेश खिलारीचा प्रेरणादायी प्रवास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘प्रयत्नांचे फळ मला मिळाले आहे. याचे श्रेय माझ्या आई वडिलांचे आहे. त्यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले त्यामुळे मला माझ संपूर्ण लक्ष परीक्षेसाठी केंद्रित करता आले. तसेच माझ्या मित्रपरिवाराने आणि शिक्षकांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केल म्हणूनच मी यशस्वी होऊ शकलो,’ असे गौरव याने सांगितले.