घाटकोपर पूर्वेतील महानगर पालिकेच्या तरण तलावात कांचन सूर्यकांत रोडे या २१ वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी पंतनगर पोलीसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
कांचन ही घाटकोपर (प.) चिराग नगर येथील आसावरे इमारतीत रहात होती.  पोहण्यासाठी उतरलेली कांचन बराच वेळ बाहेर न आल्यामुळे आईने ही बाब तेथील प्रशिक्षकाच्या लक्षात आणून दिली. तेव्हा तेथील प्रशिक्षकाने कांचनला बेशुद्धावस्थेत तलावाबाहेर काढून ताबडतोब राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, त्याआधीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghatkopar girl drowns in a swimming pool
First published on: 05-04-2015 at 02:33 IST