मुंबई : घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी इगो मीडिया कंपनीचा संचालक भावेश प्रभूदास भिंडे (५१) लोणावळा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांची सात पथके लोणावळ्याला पोहोचली. पण आरोपीने त्यापूर्वीच मोबाइल बंद करून केला. तेव्हापासून तो बेपत्ता असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत.

जाहिरात फलक कोसळल्यानंतर लगेचच भिंडे याने अटकेच्या भीतीने पळ काढला. मुंबई पोलिसांचे पथक त्याच्या मुलुंड येथील घरी पोहोचले होते. पण तो पसार झाला होता. पोलिसांनी त्याचे शेवटचे लोकेशन लोणावळा येथे असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांची पथके तेथे पाठवण्यात आली, मात्र तो घटनास्थळी सापडला नाही. त्याचा मोबाइल बंद असून त्यानंतर त्याचा कोणताही थांगपत्ता लागलेले नाही. पण त्याला आम्ही लवकरच अटक करून, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Accused in hit and run case in Ravet arrested Pune news
पिंपरी: रावेतमधील हिट अँड रन प्रकरण; चार दिवसांनी आरोपी अटकेत, ८० सीसीटीव्ही…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
man murdered colleague over dispute on food cooking
जेवण बनवण्यावरून वाद; लोखंडी रॉडनी ११ घाव घालून केली हत्या, पिंपरीतील घटना
Man Assaults Woman In Greater Noida
VIDEO : केस पकडले, कानशीलात लगावल्या; तरुणाची भररस्त्यात मैत्रिणीला मारहाण
navi Mumbai car hit six people
नवी मुंबई: मित्राच्या स्कुटीला धडक मारल्याचा राग आल्याने सरळ पाच – सहा जणांच्या अंगावर घातली गाडी
police registered case against restaurant waiter for giving impure water
डोंबिवली पलावातील हॉलमधील सेवकावर अशुध्द पाणी पिण्यास दिले म्हणून गुन्हा

हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोसाठी मेट्रो प्रवासी वेठीस, बुधवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून जागृती नगर – घाटकोपरदरम्यानची ‘मेट्रो १’ची सेवा पूर्णत: बंद

यापूर्वी भिंडे याच्यावर मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्ह दाखल आहे. भिंडेने २००९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी महापालिकेच्या परवानगीशिवाय बॅनर लावगल्याप्रकरणी त्याच्यावर २१ वेळा कारवाई करण्यात आली होती. याशिवाय दोन वेळा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याअंतर्गत त्याच्याविरोधात खटले दाखल होते. धनादेश न वठल्याप्रकरणी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याअंतर्गत खटला चालतो. यापूर्वी २४ जानेवारी रोजी मुलुंड पोलीस ठाण्यात भिंडे यांच्यावर बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलुंडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांना याबाबत विचारले असता त्यांनी भिंडेवर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. याप्रकरणी भिंडेला मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले आहे.

हेही वाचा : घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात; मुंबई पोलीस म्हणाले…

पंतनगर पोलिसांनी सोमवारी रात्री जाहिरात फलक पडून अनेकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी भिंडेविरोधात भादंवि कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), ३३८ (गंभीर दुखापत), ३३७ (निष्काळजी कृत्यामुळे दुखापत करणे) व ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.