म्हाडा सोडतीच्या कायमस्वरूपी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात होऊन एक महिना पूर्ण झाला असून या महिन्याभरात नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत (बुधवार, दुपारी ११) ९९ हजार २४८ इच्छुकांनी नोंदणी केली आहे.

हेही वाचा >>>मुंबई : डाळी, कडधान्ये शंभरीपार; होळीपर्यंत जैसे थे परिस्थिती

म्हाडाने ‘एक सोडत एक नोंदणी’ सुविधा अर्जदारांना उपलब्ध केली आहे. त्यामुळे आता प्रत्येक सोडतीसाठी वेगळी नोंदणी करण्याची गरज नाही. ही नोंदणी प्रक्रिया वर्षानुवर्षे सुरू राहणार आहे. त्यामुळे सोडत जाहीर होवो न होवो इच्छुकांना नोंदणी करता येणार आहे. मात्र इच्छुकांना नोंदणी करताना आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. या नवीन पद्धतीने सुरू झालेल्या नोंदणीला एक महिना पूर्ण झाला आहे. ५ जानेवार रोजी नोंदणी सुरू झाली असून ५ जानेवारी ते ८ फेब्रुवारीपर्यंत (दुपारी ११) ९९ हजार २४८ जणांनी नोंदणी केली आहे. नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला असून बुधवारी पुढील काही तासांत नोंदणी करणाऱ्यांची संख्या लाखापार जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>“मुख्यमंत्र्यांना गल्ली-गल्लीत फिरायला लावणार” म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना शिंदे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “गल्लीत फिरणे म्हणजे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गरजूंनाच सोडतीसाठी अर्ज करता यावेत, दलालांना वेसण घातली जावी या उद्देशाने म्हाडाने नोंदणी पद्धतीत बदल केला आहे. सध्या नोंदणी करणाऱ्यांना आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागत आहेत. त्यामुळे गरजूच नोंदणी करीत असून नोंदणी समाधानकारक असल्याचे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.