मुंबई : Mumbai Weather Effect on Railway Service मुंबई महानगरात बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली असून पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवरील वाहतूक आणि लोकल सेवा मंदावली. अनेक ठिकाणच्या सखलभागात काही प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. परिणामी, प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचण्यास विलंब होत आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने जोर धरला असून त्यामुळे मुंबईतील संपूर्ण वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. बुधवारी सकाळपासून पश्चिम द्रुतगती महामार्गावर दक्षिण मुंबईच्या दिशेने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. तसेच पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. अंधेरी, घाटकोपर, साकीनाका येथील रस्त्यांवर वाहन चालवणे वाहनचालकांना अवघड झाले.

हेही वाचा >>> मुसळधार पावसातदेखील मुंबईत १ जुलैपासून पाणीकपात होणार लागू; काय आहेत कारणे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर दृश्यमानता कमी झाल्याने लोकलचा वेग मंदावला. त्यामुळे सकाळपासून लोकल विलंबाने धावत आहेत. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल १० ते १५ मिनिटे विलाबाने धावत आहेत. नियोजित लोकल वेळेवर येत नसल्याने महत्त्वाच्या स्थानकांमध्ये  प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढत आहे. दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण या स्थानकांत प्रवाशांची गर्दी वाढल्याने गोंधळ उडाला.