लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भांडुप परिसरातील एलबीएस मार्गावरील झाड मंगळवारी रात्री पडल्यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड हटविल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली.
नाहूर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास हे झाड पडले. परिणामी, भांडुपच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी धाव घेतली आणि रस्त्यावर पडलेले झाड हटविले. त्यानंतर रात्री उशिरा येथील वाहतूक पूर्ववत झाली.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.