मुंबई : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यावतीने सप्टेंबर २०२५ मध्ये होणाऱ्या सनदी लेखापाल (सीए) परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. सीए परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ५ जुलै २०२५ पासून सुरू होणार आहे.

उमेदवारांना विलंब शुल्काशिवाय १८ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै आहे. तसेच, उमेदवारांना परीक्षा केंद्र अथवा माध्यम बदलण्यासाठी २२ ते २४ जुलै दरम्यान अर्जात आवश्यक दुरुस्ती करता येणार आहे. त्यानंतर ३ ते २२ सप्टेंबरदरम्यान परीक्षा होणार आहे. ५ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद या सार्वजनिक सुट्टीमुळे परीक्षा होणार नाही. मात्र, इतर कोणत्याही सार्वजनिक सुट्टीमुळे परीक्षेच्या तारखांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे आयसीएआयने स्पष्ट केले आहे.
असे असणार परीक्षेचे वेळापत्रक :

सीए अंतिम परीक्षा

गट १ : ३, ६ व ८ सप्टेंबर

गट २ : १०, १२ व १४ सप्टेंबर

सीए इंटरमिजिएट परीक्षा

गट १ : ४, ७ व ९ सप्टेंबर

गट २ : ११, १३ व १५ सप्टेंबर

सीए फाउंडेशन परीक्षा

१६, १८, २० व २२ सप्टेंबर

अशा आहेत परीक्षेच्या वेळा :

फाउंडेशन पेपर १ व २ : दुपारी २ ते ५

फाउंडेशन पेपर ३ व ४ : दुपारी २ ते ४

सर्व इंटरमिजिएट पेपर्स : दुपारी २ ते ५

अंतिम पेपर १ ते ५ : दुपारी २ ते ५

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंतिम पेपर ६ : दुपारी २ ते ६