लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: उद्या सोमवारी ५ जून रोजी अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले परिसरात १६ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. जलवाहिनी जोडण्याच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आजच पाणीसाठा करावा लागणार आहे.

अंधेरी पूर्वेकडील महाकाली गुंफ़ा मार्गावरील ‘रम्य जीवन सोसायटी’ जवळ तसेच कार्डिनल ग्रेसीयस मार्ग व बी. डी. सावंत मार्ग चौक, अंधेरी (पूर्व)’ येथे नवीन १५०० मिली मीटर व्यासाची जलवाहिनी आणि १२०० मिली मीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम सोमवार ५ जून २०२३ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे के पूर्व आणि के पश्चिम विभागातील काही परिसरांत १६ तास पाणी पुरवठा करण्यात येणार नाही.

आणखी वाचा- धारावी येथे मारहाणीत एकाचा मृत्यू, आरोपीला अटक

या विभागात पाणीपुरवठ्यावर परिणाम-

त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर कॉलनी, दुर्गा नगर, मातोश्री क्लब, जोगेश्वरी (पूर्व) – पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.
सारीपुत नगर, दुर्गा नगर, जोगेश्वरी (पूर्व) – पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

विशाल हॉल, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकर वाडी, बिमा नगर, गुंदवली गावठाण पंथकी बाग, तेली गल्ली, कोलडोंगरी, जीवा महाले रोड, साईवाडी, जीवन विकास केंद्र मार्ग, अंधेरी (पूर्व) शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान रोड, श्रद्धानंद रोड, नेहरू रोड, तेजपाल रोड, शास्त्री नगर, राजेंद्र प्रसाद नगर, आंबेडकर नगर, काजुवाडी, विले-पार्ले पूर्व तसेच विले-पार्ले पूर्व डोमेस्टिक एयरपोर्ट, अमृतनगर, रामबाग, चकाला गावठाण, चकाला वजन काटा, अंधेरी पूर्व पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

मोगरपाडा, नवीन नागरदास रोड, जुना नागरदास रोड, अंधेरी (पूर्व) – पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.

मोरागाव, जुहू गावठाण, सांताक्रूझ (पूर्व) – पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वांद्रे पूर्वमध्ये आजपासून कमी दाबाने पाणी पुरवठा

वांद्रे, सांताक्रूझ, खारच्या पूर्व भागात रविवारपासून पुढील चार दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. सांताक्रुझ (पूर्व) येथील टीचर्स कॉलनी स्‍मशानभूमी नजिकच्‍या १ हजार २०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे आणि मजबुतीकरणाचे काम बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या जल अभियंता खात्‍यातर्फे हाती घेण्यात येणार आहे. या कामांमुळे रविवारी ४ जून ते गुरूवार ८ जून २०२३ दरम्‍यान एच / पूर्व विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.