आपली बिले वेळेत मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज मुंबई मंडळातील सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाच्या कार्यलयाबाहेर ठेकेदारांनी आंदोलन केले. मागील चार वर्षांपासूनची बिले थकीत आहेत. त्याच्या विरोधात हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी फक्त बिल देण्याचे आश्वसने देतात. कार्यकारी अभियंता नवीन आल्यामुळे जुनी बिले ठेऊन आपल्या मर्जीतील ठेकेदारांची बिले काढतात असा आरोप ठेकेदारांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापूर्वीच्या कार्यकारी अभियंता अनिता परदेशी यांनी काढलेल्या सर्व बिलांची चौकशी करावी अशी मागणी या ठेकेदारांनी केली आहे. मागील चार वर्षात दोनशे कोटी पेक्षा जास्त रक्कमेची कामे करण्यात आली मात्र. त्यातील कोणतेही बिल एका ठेकेदाराला मिळालेले नाही. जर पुढील दहा दिवसांत जर बिले मिळाली नाही तर मुंबई मंडळाच्या अधीक्षक अभियंता यांना घेराव घालण्याचा निर्धार ठेकेदारांनी व्यक्त केला आहे. वेळोवेळी पत्रव्यवहार करून ही बिल देत नसल्यामुळे हे ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार केल्याचे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल कॉन्ट्रॅक्टटर वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In andheri protest by contractors outside pwd office
First published on: 24-09-2018 at 22:43 IST