मुंबई : शिवाजी पार्क येथील प्रसिद्ध महाविद्यालयातील वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून १९ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी घडला आहे. परीक्षेत नक्कल (कॉपी) करताना त्याला पर्यवेक्षकांनी पकडले होते. त्यामुळे त्याने तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. याबाबत तपासणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा… साहिल खानने चौकशीसाठी अवधी मागितला, महादेव बुक बेटिंग अ‍ॅप प्रकरण

लक्ष सतेंदर फर्मा (१९) असे विद्यार्थ्याचे नाव असून तो शिवाजी पार्क येथील प्रसिद्ध हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. नवी दिल्लीतील मूळचा रहिवासी असलेल्या लक्ष पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत होता. परीक्षेदरम्यान लक्षला नक्कल करताना पर्यवेक्षकांनी पकडले होते. त्यामुळे तो तणावाखाली होता. त्यानंतर त्याने वसतिगृहातील सातव्या मजल्यावरील खोलीत जाऊन तेथून उडी मारली. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शिवाजी पार्क पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असून नवी दिल्लीतील लक्षच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.