मुंबई : ताडी पिण्यावरून झालेल्या वादातून साकीनाका येथे एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. आरोपीने मृत व्यक्तीच्या डोक्यावर ताडीची बाटली मारली, त्यानंतर फुटलेली बाटली मृत व्यक्तीला भोसकल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी ४० वर्षीय आरोपीला अटक केली आहे. खुर्शीद उर्फ रिझवान शेख (३६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो कुर्ला पश्चिम येथील जरीमरी परिसरातील रहिवासी होता. काजूपाडा येथील ज्योती ताडी-माडी केंद्रात हा प्रकार घडला.

याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपलेल्या चित्रणाच्या मदतीने आरोपी शेरअली शेख (४०) याला अटक केली. आरोपी व मृत व्यक्ती दोघेही एकमेकांना ओळखत होते. दोघेही ताडी-माडी केंद्रावर ताडी पित बसले होते. त्यावेळी दोघांमध्ये झालेल्या वादातून आरोपी शेरअलीने खुर्शिदला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्याचा राग अनावर झाल्याने त्याने थेट ताडीची बाटली उचलून खुर्शीदच्या डोक्यात मारली. त्यानंतर बाटली फुटली. फुटलेली बाटली आरोपी शेरअलीने खुर्शीदच्या पोटात भोसकली.

हेही वाचा : मैत्रीला कलंक! दिल्लीतील फॅशन डिझायनरवर मुंबईत बलात्कार, पीडितेच्या व्यावसायिक मित्रानेच केला घात!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जखमी खुर्शीदला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या डोक्यावर व पोटात गंभीर जखमा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शाह आलम शेख याच्या तक्रारीवरून साकीनाका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने आरोपी शेरअलीची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली.