मुंबई : केंद्रीय मंत्री व उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पियूष गोयल यांच्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कांदिवली पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार संदीप खेडकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : अदानीची वीज महागली; मे महिन्यापासून इंधन अधिभारात वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारीनुसार, मुंबई काँग्रेसचे फलक लावलेल्या दोन वाहनांतून १० ते १२ जण आले आणि त्यांनी पीयूष गोयल यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. भाजप कार्यालयासमोर ही घोषणाबाजी करण्यात आली. तसेच त्यांनी फलकही हाती घेतले होते. या फलकांवर गोयल यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर लिहिण्यात आल्याचा आरोप आहे. अजंता यादव, मुमताज पठाण, मंगल काळे, रोहित जोशी, मोहम्मद वाहिम मोहम्मद हनिफ शेख यांच्याविरुद्ध चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.