मुंबई : उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला नसतानाही मंगळवारी मुंबई आणि परिसरातील तापमानात अचानक वाढ झाली. उपनगरांतील पारा ३९ अंशापार गेला. वाऱ्याच्या प्रतिचक्रीय स्थितीमुळे पूर्वेकडून वाहणारे उष्ण वारे सक्रिय असल्याने चढ्या तापमानाचा सामना करावा लागला. बुधवारीही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला नसला तरी उष्ण व दमट वातावरण राहील, अशी शक्यता आहे.
उन्हाऴयाच्या हंगामाचा दुसराच महिना असूनही उन्हाच्या तीव्र चटक्यांचा अनुभव येत आहे. महिन्याच्या सुरुवातीला मुंबई परिसरासह कोकण विभागात उष्ण्तेच्या लाटा निर्माण झाल्या. आठवडाभर सातत्याने वाढत गेलेल्या मुंबईच्या (पान ६ वर) (पान १ वरून) तापमानाने मंगळवारी कळस गाठला. घराबाहेर पडल्यानंतर उन्हाच्या असह्य झळा सोसाव्या लागत होत्या. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात मंगळवारी ३९.२ अंश सेल्सिअस, तर कुलाबा येथे ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा तब्बल ६ अंशांनी अधिक आहे. गरम हवा, तापमानाचा ताप, असह्य उष्मा, सातत्याने पाणी पिऊनही घशाला पडणारी कोरड, अतिरिक्त दमवणूक अशी अवस्था मुंबईकरांची मंगळवारी झाली. वाऱ्याच्या प्रतिचक्रीय स्थितीमुळे तसेच पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानवाढ झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तापमानाची जाणीव प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक होईल, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
प्रत्येक उन्हाळ्यात मुंबईतही उष्णतेची लाट अनुभवास येते. ही लाट तीन ते चार दिवस टिकू शकते.
सुनील कांबळे, प्रमुख, प्रादेशिक हवामान विभाग
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
अकोला सर्वांत तप्त मुंबईसह ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात गेले काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर उष्ण व दमट हवामान राहील असा अंदाज होता. मंगळवारी कोकण विभागात सर्वाधिक तापमानाची नोंद रत्नागिरी जिल्ह्यात झाली. येथे ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले. तर राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला (३९.५ अंश) येथे झाली.