मुंबई : दक्षिण मुंबईतील महात्मा ज्योतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) येथील वाहनतळ शुक्रवार, ५ जानेवारीपासून सर्व वाहनांसाठी निशुल्क करण्यात येणार आहे. येथे वाहनांच्या पार्किंगसाठी पालिकेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारले जात असल्यामुळे ‘ए’ विभागाने हे वाहनतळ चालवणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस बजावली असून दंडात्मक कारवाईही केली आहे. तसेच नवीन कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत हे वाहनतळ सर्व वाहनचालकांसाठी नि:शुल्क करण्यात आले आहे.

हेही वाचा : मुंबई महानगरात प्रवेश करण्यासाठी एकच टोल ? भाजपा जाहिरनाम्यात घोषणा करणार ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईमध्ये रस्त्यांवरल ९१ वाहनतळे असून, ती चालवण्यासाठी दिलेले कंत्राटदार महापालिकेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा वाहनचालकांकडून पार्किंगसाठी जास्त दर आकारत असत. त्यांच्याविरोधातील तक्रारी वाढल्यामुळे त्यांची मक्तेदारी मोडण्यासाठी पालिकेने २०१७ मध्ये पालिकेने रस्त्यावरील सशुल्क वाहनतळांसाठी सुधारित धोरण आणले होते. तसेच पालिकेने वाहनतळांसाठी दरही ठरवून दिले होते. मात्र तरीही अनेक ठिकाणी वाहनचालकांकडून जास्त दर घेण्यात येत आहेत. महात्मा फुले मंडई येथील वाहनतळाच्या ठिकाणी कंत्राटदार जादा दर आकारत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालिकेने कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली आहे.