मुंबई: मध्य रेल्वेवरील प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दादर-मनमाड आणि दादर-धुळे अनुक्रमे जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत चालवण्यात येईल.

गाडी क्रमांक ०२१०२ मनमाड – दादर त्रि-साप्ताहिक विशेष गाडी दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी चालवण्यात येते. ही गाडी २९ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात आली. तर आता ४ ऑक्टोबरपासून ते ३१ डिसेंबरपर्यंत ही विशेष गाडी चालवण्यात येईल.

हेही वाचा… अभिनेता विवेक ओबेरॉयची दीड कोटींना फसवणूक, व्यावसायिक भागिदाराला अटक

गाडी क्रमांक ०२१०१ दादर – मनमाड त्रि-साप्ताहिक विशेष दर मंगळवार, बुधवार, शनिवारी ३० सप्टेंबरपर्यंत चालविण्यात आली. तर आता ४ ऑक्टोबरपासून ते २ जानेवारीपर्यंत चालविण्यात येईल. गाडी क्रमांक ०१०६५ दादर-धुळे त्रि-साप्ताहिक विशेष गाडी दर सोमवार, शुक्रवार, रविवारी ३० सप्टेंबरपर्यंत चालविण्यात आली. तर ही विशेष गाडी ६ ऑक्टोबर ते १ जानेवारीपर्यंत चालविण्यात येईल. तसेच गाडी क्रमांक ०१०६६ धुळे-दादर त्रि-साप्ताहिक विशेष गाडी दर सोमवार, मंगळवार, शनिवारी ३० सप्टेंबर ऐवजी आता ७ ऑक्टोबर ते २ जानेवारीपर्यंत चालवण्यात येईल.

हेही वाचा… ‘इंडिया’च्या ‘मी पण गांधी’ पदयात्रेला गालबोट, मुंबईत कार्यकर्ते-पोलिसांत धुमश्चक्री, अनेक नेते-पदाधिकारी ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या विशेष गाड्यांच्या वेळेत, संरचनेत आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच वाढविलेल्या कालावधीत विशेष गाडीचे तिकीट आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.