समीर वानखेडे प्रकरण: “एवढे पुरावे आहेत तर…”; जास्मिन वानखेडेंचं नवाब मलिकांना चॅलेंज

समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आणि बहीण जास्मिन वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्हाला धमकावण्यात येत असल्याचे आरोप केले.

nawab malik jasmin wankhede
पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केली भूमिका

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीवर वानखेडेंवर केलेल्या आरोपांनंतर आज वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आणि बहीण जास्मिन वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्हाला धमकावण्यात येत असल्याचे आरोप केले. नवाब मलिक यांनी केलेले आरोप हे चुकीचे असून ते समीवर वानखेडेंचा जन्माचा दाखला का शोधत आहेत असा प्रश्न जास्मिन वानखेडेंनी उपस्थित केलाय. तसेच समीर वानखेडेंविरोधात सुरु असलेला हा सर्व प्रकार पैसे देऊन घडवला जात असल्याची माहिती आपल्याला मिळालीय असंही जास्मिन वानखेडे म्हणाल्यात.

समीवर वानखेडेंच्या जन्माच्या दाखल्यावरुन प्रश्न विचारला असता, “ते तो दाखला शोधतायत कशाला, त्यांची रिसर्च टीम अशी आहे की ते मुंबईतील फोटो दुबईचा सांगतात. तुम्ही त्यांचा जन्मदाखला का काढताय हा आमचा प्रश्न आहे,” असं त्या म्हणाल्या.

समीर वानखेडेंवर का असे आरोप केले जातायत?, असा प्रश्न जास्मिन वानखेडेंना विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी, आज काय परिस्थिती आहे बघा. आमचं काम काय आहे आणि आम्हाला ते सोडून तुमच्याशी बोलावं लागतंय. आम्ही वर्किंग माहिला आहोत. आम्हाला धमक्या मिळतायत, जीवे मारु असं धमकावलं जात आहे. कापून टाकू, मारुन टाकून असे कॉल येतायत. मला पण असं वाटतंय की मी रोज प्रेस कॉन्फरन्स घेतल्या पाहिजेत आणि आरोप, दावे केले पाहिजे. हे मीडिया ट्रायल आहे असं वाटतंय आता, अशी थंत व्यक्त केली.

क्रांतीनेही आपली बाजू मांडताना नवाब मलिक यांनी केले आरोप खोडून काढले. त्यांनी म्हटलं की जन्माच्या दाखल्यापासून सुरु होतो गोंधळ असं ते म्हणाले. रिलिजन, कास्ट सगळ्याची कागदपत्रं आम्ही दिली आहे. सरकारी कागदपत्रं हे पुरावा म्हणून भारतात सगळं काही असतं, असं क्रांती म्हणालीय.

समीर वानखेडे यामधून नक्कीच बाहेर पडतील. आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे. पोलीस स्थानकात तक्रार केलेली नाहीय, असं जास्मिन वानखेडेंनी सांगितलं. आम्हला शिवीगाळ करणारे आणि धमकावणाऱ्या कमेंट्सचे आम्ही स्क्रीनशॉर्ट घेतलेत. या मागे कोणत्या पीआर यंत्रणा आहेत कोण डेथ थ्रेट देतात याचे स्क्रीनशॉर्ट संबंधित यंत्रणांकडे दिले आहेत. जो कोण धमकावण्याचा प्रयत्न करतोय त्याचा पर्दाफाश होईल, असं क्रांती म्हणालीय.

“आज त्यांनी नवा दावा केलाय ट्विटरवरच केला असेल. त्यांच्याकडे पुरावे आहेत का?” असा प्रश्न जास्मिन वानखेडेंनी नवाब मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेसंदर्भात छेडले असता उपस्थित केला. तसेच पुढे बोलताना, “ते (मलिक) अनोखळी कागदपत्रं देतात. एवढे पुरावे आहेत तर न्यायालयात जा, आम्ही कोर्टात लढू,” असं थेट आव्हान जास्मिन वानखेडेंनी मलिक यांना दिलं आहे.

मालदीवमध्ये बॉलिवूडचे कोण लोक होते ते सांगा आम्हाला. किमान आम्हाला तरी सांगा. आम्ही दोघी एकत्र गेलो नव्हतो. आम्हाला एकही सेलिब्रेटी दिसली नाही. बकवास करत आहेत ते, असं जास्मिन वानखेडे म्हणाल्या. या साऱ्या मागे पेड लॉबी असल्याचं आम्हाला कळलंय असंही जास्मिन वानखेडेंनी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jasmin wankhede slams nawab malik says if you have a proof then go to court scsg

ताज्या बातम्या