मुंबई : मध्य रेल्वेने कर्जत यार्ड पुनर्बांधणीसाठी सलग ब्लाॅक घेण्याचे नियोजन केले आहे. २४ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत विशेष ब्लॉक असतील. त्यामुळे कर्जत-खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा उपलब्ध नसतील.
कर्जत यार्ड पुनर्बांधणीच्या कामासंदर्भात कर्जत स्थानकावर पोस्ट नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी मध्य रेल्वे विशेष वाहतूक ब्लाॅक मालिका सुरू होईल. २४ ऑक्टोबर रोजी, २७ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर रोजीपर्यंत सकाळी ११.२० ते दुपारी १.२० पर्यंत ब्लॉक असेल. २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.२० ते दुपारी ३.४५ पर्यंत ब्लॉक असेल. हा ब्लॉक नागनाथ केबिन ते कर्जत स्थानकादरम्यान असेल. या कालावधीत कर्जत ते खोपोली दरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल.
२४, २५, २८ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी या लोकल रद्द
- दुपारी १२ आणि दुपारी १.१५ वाजता कर्जत ते खोपोली लोकल रद्द
-सकाळी ११.२०, दुपारी १२.४० वाजता सुटणाऱ्या खोपोली ते कर्जत लोकल रद्द करण्यात येतील. - ब्लॉकच्या इतर दिवशी लोकल रद्द केल्या जाणार नाहीत.
