मुंबई : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. प्रचंड दूरदृष्टी आणि विद्वत्ता असलेल्या डॉ. आंबेडकरांनी संविधान सभेच्या माध्यमातून केवळ एक उत्कृष्ट मसुदा तयार केला नाही, तर विविध तरतुदींमागील तत्त्वज्ञानही अधोरेखित केले. भारताला अखंड ठेवून एकसंध राखणे हे डॉ. आंबेडकरांचे सर्वोच्च योगदान आहे. स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करीत असताना जातीभेद व उच्चनीचता विरहित समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावेत आणि डॉ आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत साकार करावा’, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथील ‘ग्रेज इन’ या संस्थेतून बॅरिस्टर ही सर्वोच्च पदवी प्राप्त केली आणि मुंबई उच्च न्यायालयाची वकिलीची सनद प्राप्त करून ५ जुलै १९२३ रोजी वकिलीस प्रारंभ केला. या ऐतिहासिक घटनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, मुंबई विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र व विधि विभाग आणि अधिवक्ता परिषद कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ ज्युरिस्ट’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keep india intact dr babasaheb ambedkar highest contribution governor ramesh bais ysh
First published on: 10-09-2023 at 00:53 IST