मुंबई: पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका महिला टोळीला भांडुप पोलिसांनी बारा तासाच्या आत अटक केली आहे. या टोळीने अपहरण केलेल्या मुलीची पोलिसांनी सुखरूप सुटका केली असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

भांडुप परिसरात राहणारी पीडित मुलगी रविवारी रात्री परिसरातील एका दुकानात फुगे घेण्यासाठी गेली होती. मात्र बराच वेळ होऊन देखील ती घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. त्या दरम्यान परिसरातील एका महिलेसह मुलगी रिक्षातून गेल्याची माहिती एका महिलेने मुलीच्या आई-वडिलांना दिली. त्यानुसार मुलीच्या आई-वडिलांनी याबाबत भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तत्काळ गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.

Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
Accused in gang rape case
सामूहिक बलात्कार प्रकरणातील नऊ वर्ष पसार असलेल्या आरोपीला अटक
child who fell into the open canal rescued
सोलापूर: उघड्या कूपनलिकेत पडलेल्या बालकास सुखरूप बाहेर काढण्यास यश

हेही वाचा – साहेब, जागा वाचवा… – नाशिकच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

हेही वाचा – नीट, एमएचटी-सीईटी एकाच दिवशी, सीईटी सेलवर दोनच दिवसांत पुन्हा वेळापत्रक बदलण्याची वेळ!

हेही वाचा – विश्लेषण : वनखात्यातील अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण काय आहे? वनखात्याची भूमिका वादग्रस्त कशी?

तपासात परिसरातील खुशबू गुप्ता (१९) हिने मैना दिलोड (३९) हिच्या मदतीने मुलीचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या दोघींना ताब्यात घेतले. त्यांनी ठाणे परिसरात राहणाऱ्या दिव्या सिंह (३३) आणि पायल सिंग (३२) यांच्याकडे मुलीची विक्री केल्याचे सांगितले.पोलिसांनी तत्काळ त्या दोघींचा शोध घेत सापळा रचून त्यांना ठाणे परिसरातून ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अपहरण झालेल्या मुलीची सुखरूप सुटका केली असून पोलिसांनी मुलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले आहे.