मुंबई : आयटी ते नवउद्यामी (स्टार्टअप्स) उपक्रम आणि सेमीकंडक्टर ते रोबोटिक्स अशी नवनवीन उद्याोग क्षेत्र राज्याच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टपूर्तीला खुणावत आहेत. राज्याच्या उज्ज्वल उद्यामी भविष्याकडील वाटचालीतील संधी आणि आव्हानांचा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सोमवारी सर्वसमावेशक संवाद याच अनुषंगाने योजला आहे. महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळ या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत.
उद्याोजक, तज्ज्ञ विश्लेषक यांना सरकार-प्रशासनाशी थेट संवादाचे ‘लोकसत्ता उद्याोगचर्चा’ हे सर्वांगीण व्यासपीठच ठरेल. आरपीजी समूहाचे उपाध्यक्ष अनंत गोएंका, उद्याोग संघटना ‘फिक्की’चे महाराष्ट्राचे सह-अध्यक्ष आणि सत्यगिरी समूहाचे अध्यक्ष दिनेश जोशी, स्टरलाइट पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक प्रतीक अग्रवाल या नामांकित उद्याोजकांचा सहभाग या निमित्ताने होत असलेल्या परिसंवादात असेल. बरोबरीनेच ‘महाजेन्को’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. तसेच राज्याचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंग कुशवाह हे प्रमुख वक्ते असतील. महाराष्ट्राच्या औद्याोगिक वाटचालीसाठी दिशादर्शक ठरणारी ही चर्चा ठरेल. परिसंवादाचा समारोप महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू यांच्या भाषणाने होणार आहे.
राज्यात नवनवीन प्रकल्प गुंतवणुकीचे करार-मदार लक्षणीय प्रमाणात सुरू आहेत. अनेक उद्याोगधंदे राज्यात पूर्वापार स्थिरावले आहेत, तर नवनवीन उद्याोगांकडून निरंतर प्रकल्प गुंतवणूक सुरू आहे. बड्या महानगरांतच नव्हे, तर राज्याच्या इतर भागांतही ते फैलावत असल्याने रोजगाराच्या संधीही सर्वत्र उपलब्ध होत आहेत. तथापि उद्याोग विकासासाठी आणखी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, कोणत्या त्रुटी आहेत, उद्याोगांची उभारणीत सुलभतेसाठी कशाला महत्त्व दिले जावे, यासंदर्भात उद्याोजकांचेही काही म्हणणे आहे. सूक्ष्म, लघू व मध्यम (एमएसएमई) उद्याोगांची बड्या उद्याोगांना पूरक भूमिका अणि त्यांच्या अडचणी दूर करणे ही देखील राज्याच्या सर्वांगीण विकासालाच चालना ठरेल. याबद्दलचे सखोल विचारमंथन म्हणून या चर्चासत्राचे खास महत्त्व आहे.
उद्योजक, निवडक वाचकांनाही सहभागाची संधी
राज्यात उद्याोगांच्या विकासवाटांशी संबंधित विचार आणि माहितीच्या या देवाणघेवाणात उद्याोजकांना आणि ‘लोकसत्ता’च्या निवडक वाचकांनाही सहभागाची संधी मिळणार आहे. निवडक निमंत्रितांच्या यादीत स्थान मिळवू इच्छिणाऱ्या उद्याोजक, वाचकांनी eventloksatta@gmail. com या ई-मेलवर त्यांची सहभागाची इच्छा कळवावी आणि त्यांच्या सहभागाच्या अनुषंगाने कारणही नमूद करावे.