मुंबई : राज्यात भाजप- शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्यानंतर पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्यात ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वेध लागले होते. अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा रंगत होती. मात्र, या चर्चेला आता विराम लागला असून चर्चेतील नावांची बदलीच झाली नाही. राज्यातील २३ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या आणि राज्य पोलीस सेवेतील दोन अशा २५ अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. २५ पोलीस उपआयुक्त, पोलीस अधीक्षकांच्या राज्यभरात वेगवेगळय़ा ठिकाणी बदल्या झाल्या आहेत. याबाबत गृह मंत्रालयाने गुरुवारी आदेश काढले.
मुंबई पोलीस उपआयुक्त नीलोत्पल यांची बदली गडचिरोली पोलीस अधीक्षकपदी झाली. तर मुंबई पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांची बदली नांदेड पोलीस अधीक्षकपदी झाली. मुंबई राज्य गुप्त वार्ता विभाग रवींद्रसिंग परदेशी यांची बदली चंद्रपूर पोलीस अधीक्षकपदी झाली आहे. तसेच, ठाणे शहर पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांची बदली नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे प्राचार्यपदी झाली. सध्या या पदावर असलेले श्रीकांत परोपकारी यांची ठाणे शहर पोलीस उपआयुक्तपदी नेमणूक झाली. राज्यपालांचे परिसाहाय्यक सिंगुरी आनंद यांची नागपूर (ग्रामीण) पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पराग मणेरे यांची विशेष सुरक्षा विभागात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.
या नवनियुक्ती आदेशानुसार सध्या कार्यरत मोहितकुमार गर्ग, राजेंद्र दाभाडे, दीक्षितकुमार गेडाम, अजय कुमार बन्सल, अभिनव देशमुख, तेजस्वी सातपुते, मनोज पाटील, प्रविण मुंडे, जयंत मीना, राकेश कलासागर, पी.पी. शेवाळे, अरविंद चावरिया, दिलीप पाटील-भुजबळ, जी. श्रीधर, अरविंद साळवे, प्रशांत होळकर, विश्वा पानसरे, प्रविण पाटील आणि विजयकुमार मगर या भापोसे अधिकाऱ्यांची, तर राज्य पोलीस सेवेतील निकेश खाटमोडे यांचीही बदली करण्यात आली असून त्यांच्या नवीन पदस्थापनेचे आदेश लवकरच स्वतंत्रपणे काढण्यात येतील असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
गृह मंत्रालयाने जारी केलेल्या बदली आदेशानुसार, धनंजय कुलकर्णी यांची रत्नागिरी, पवन बनसोड यांची सिंधुदुर्ग, बसवराज तेली यांची सांगली, शेख अस्लम यांची सातारा, अंकित गोयल यांची पुणे ग्रामीण, शिरीष सरदेशपांडे यांची सोलापूर ग्रामीण, राकेश ओला यांची अहमदनगर, एम. राजकुमार यांची जळगाव, रागसुधा आर. यांची परभणी, संदीप सिंह गिल यांची हिंगोली येथे नियुक्ती केली आहे. श्रीकृष्ण कोकाटे यांची नांदेड, सोमय विनायक मुंडे यांची लातूर, सारंग डी. आवाड यांची बुलढाणा, गौरव सिंह यांची यवतमाळ, संदीप घुगे यांची अकोला, रवींद्रसिंग एस. परदेशी यांची चंद्रपूर, नुरुल हसन यांची वर्धा, निखिल पिंगळे यांची गोंदीया, नीलोत्पल यांची गडचिरोली, संजय बारकुंड यांची धुळे, सचिन पाटील यांची गुन्हे अन्वेषण विभाग औरंगाबाद आणि सिंगुरी आनंद यांची नागपूर ग्रामीण येथे पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, राज्य पोलीस सेवेतील ठाणे शहरचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे प्राचार्यपदी आणि नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पराग मणेरे यांची विशेष सुरक्षा विभागात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.