मुंबई : वस्तू व सेवा कर आकारणी, थेट विदेशी गुंतवणूक आदी क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेले महाराष्ट्र राज्य हे दरडोई राज्य उत्पन्नात देशात सहाव्या क्रमांकावरील राज्य आहे. तेलंगणा, कर्नाटक, हरयाणा आदी राज्यांनी महाराष्ट्राला मागे टाकले आहे. राज्याचे २०२२-२३ मध्ये दरडोई उत्पन्न २ लाख, ५२ हजार ३८९ कोटी अपेक्षित धरण्यात आले आहे. २०२१-२२ मध्ये हेच उत्पन्न २ लाख, १५ हजार ५७३ कोटी रुपये होते. २०२१-२२ मध्ये देशात दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावरील राज्य होते. सरत्या आर्थिक वर्षात गुजरात राज्याने मागे टाकल्याने महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावरील राज्य ठरले आहे. तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू ही दक्षिणेकडील राज्ये महाराष्ट्रापेक्षा पुढे आहेत.

राज्यातील विभागनिहाय दरडोई उत्पन्न

● कोकण – ३,६४,६६८ कोटी

● पुणे- २,७७,४५३ कोटी

● नागपूर – २,२५,७५५ कोटी

● नाशिक – १,९७,२२७ कोटी,

● छत्रपती संभाजीनगर-१,७३,५३३ कोटी

● अमरावती – १,४५,९१७ कोटी.

हेही वाचा >>>प्राधिकरणांना ‘झोपु’चे लक्ष्य!दोन लाख झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश

राज्यांचे दरडोई उत्पन्न (२०२२२३)

● तेलंगणा – ३ लाख, ११ हजार, ६४९ कोटी

● कर्नाटक – ३ लाख, ०४ हजार, ४७४ कोटी

● हरियाणा – २ लाख, ९६ हजार, ५९२ कोटी

● तमिळनाडू – २ लाख, ७५ हजार, ५८३ कोटी

● गुजरात – २ लाख, ७३ हजार, ५५८ कोटी

● महाराष्ट्र – २ लाख, ५२ हजार, ३८९ कोटी

● आंध्र प्रदेश – २ लाख, १९ हजार, ८८१ कोटी

● उत्तर प्रदेश – ८३,६३६ कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हानिहाय दरडोई उत्पन्न

राज्यात मुंबई (४,१२,६९० कोटी), ठाणे जिल्हा (३,५३,२९९कोटी), पुणे जिल्हा (३,३६,५०३ कोटी), नागपूर जिल्हा (२,९२,६०७ कोटी), रायगड जिल्हा (२,८७,३९७ कोटी), नाशिक जिल्हा (२,३०,६१६), छत्रपती संभाजीनगर (२,०८,३६६ कोटी). वाशीम, नंदुरबार आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न हे १ लाख २० हजार कोटींच्या दरम्यान आहे.