मुंबई : राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतपीक, फळबागांच्या नुकसानीचे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल विनाविलंब सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सोमवारी दिले. भारतीय हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागांत पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
प्रशासनाने या भागातील नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी सर्तक राहावे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या घटकांना त्वरित मदत मिळावी यासाठी प्रशासनाने अतिवृष्टी, पुरामुळे बाधितांचे तातडीने पंचनामे करावेत. या नुकसानीचा अहवाल संबंधित विभागीय आयुक्तांमार्फत शासनास सादर करावा. यासंदर्भात प्रशासनाला सूचना दिल्या आहेत, असे पाटील यांनी सांगितले.