महिला पत्रकार आणि तिच्या पतीकडून पैस उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया पोलिसाला मुंबई पोलिसांनी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळील सरदार तारासिंग तलावजवळ अटक केली आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पुणे : दुचाकीच्या स्टीकरवरुन लागला चोरट्याचा माग; कोंढव्यातील ३७ लाखांची घरफोडी उघड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळच्या सुमारास महिला पत्रकार आपल्या पतीसह ईस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळील सरदार तारासिंग तलावजवळ कारमध्ये बसली होती. यावेळी अचानक एका व्यक्तीने त्यांचे फोटो काढण्यास सुरूवात केली. याबाबत त्याला विचारले असता, त्याने स्वत:ला पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच महिला पत्रकार आणि तिच्या पतीकडे पैशांची मागणी केली. दोघांनी त्याला पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने लगेच वरिष्ठांना फोन केल्याचं भासवलं. यावेळी महिलेने संपूर्ण घटनेची माहिती पोलीस कंट्रोल रूमला दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तोतया पोलिसाला अटक केली.

दरम्यान, आरोपी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. चौकशी दरम्यान आरोपीने आपण पोलीस नसून एका खासगी कंपनीत काम करत असल्याची कुबली दिली. तसेच महिलेकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न होता, असेही त्याने पोलिसांना सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man arrest for extort money from women journalist in mumbai spb
First published on: 11-01-2023 at 07:58 IST