वांद्रे- वरळी सी-लिंकवरून एका व्यक्तीने समुद्रात उडी घेतल्याचा प्रकार आज समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस, भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
मुंबईतील वांद्रे वरळी सी-लिंकवर वाहने थांबवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे या सेतूवरून भरधाव वेगाने वाहतूक सुरू असते. अशातच एका व्यक्तीने आज वांद्रे वरळी सी लिंकवर गाडी थांबवली. गाडीतून बाहेर आला आणि त्याने थेट समुद्रात उडी मारली. मुंबई पोलीस, भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर शोध मोहिमेसाठी तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान, या व्यक्तीचं नाव समजू शकलेलं नाही. त्याने समुद्रात उडी का मारली याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.