मित्रांना वाचवण्यासाठी भांडणात मधस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या करण्यात अल्याची घटना शिवाजी नगरमध्ये घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवत पोलीस अधिक तपास करत आहे. गोवंडी परिसरात राहणाऱ्या नाझीया मेहमुद आलम शाह (२४) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार रफीक नगर येथे हल्ल्यात सादिक हुसेन उर्फ दानिश (२२) या तरूणाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सईदुर रेहमान शेख या आरोपीचा शोध सुरू आहे.

हेही वाचा >>> उच्च न्यायालयातील पाळणाघर न्यायापासून वंचित; प्रतिसादच नसल्याने आणि माहितीअभावी नस्तींच्या खोलीत रूपांतर

रविवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली. आरोपी शेख याने दानिश याच्या मित्र जावेद व नदीम यांचे सोबत झालेल्या भांडणाचा तसेच पत्नीसमोर मारहाण झाल्याचा अपमानाचा राग मनात ठेवून सूड घेण्याचे ठरवले. जावेद व नदीम यांचे सोबत भांडण करुन कैचीने जावेद याचे डोक्यावर वार केला मात्र तो वार जावेद याने चुकवल्याने त्याच्या डाव्या हातावर दुखापत झाली. तसेच नदीमही जखमी झाला. यावेळी दानिश त्यांना वाचवण्यासाठी मध्ये आल्याचा राग मनात धरून त्याचे डोक्यावर व पाठीवर जबर वार करून त्याला जीवे ठार मारले. तसेच दानिशच्या मदतीसाठी आलेले कमरूद्दीन जखमी झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.