Death Threat to Shahrukh Khan: बॉलिवुड अभिनेता सलमान खानला गेल्या काही दिवसांत तीन वेळा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यानंतर आता शाहरुख खानलाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ५० लाखांची मागणी करत शाहरुख खानला ५ नोव्हेंबर रोजी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. धमकीचा फोन वांद्रे पोलीस ठाण्याला आला होता. पोलिसांनी या मोबाइल नंबरचा शोध घेतला आणि रायपूरमधून वकील फैजान खानला ताब्यात घेतले. मात्र आता फैजान खान यांनी भलताच दावा केला हे. त्यांचा मोबाइल चोरी झाला होता, त्यामुळे कुणी धमकी दिली, याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे ते म्हणाले. तसेच १९९४ साली फैजान खान यांनी शाहरुख खानच्या विरोधात एक तक्रार दाखल केली होती, असेही आता समोर आले आहे.

छत्तीसगडच्या रायपूर येथील वकील फैजान खान यांनी सांगितले की, २ नोव्हेंबर रोजी त्यांचा मोबाइल चोरीला गेला होता. याबद्दल त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली. त्यामुळे चोरी झालेल्या मोबाइलवरून कुणीतरी धमकी दिली असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला. तसेच १९९४ साली शाहरुख खानच्या अंजाम चित्रपटातील एका संवादावर फैजान खान यांनी आक्षेप घेत शाहरुख खानच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

हे वाचा >> सलमानपाठोपाठ शाहरूख खानलाही जीवे मारण्याची धमकी, ५० लाखांच्या खंडणीची मागणी!

चौकशीदरम्यान फैजान खान यांनी सांगितले की, ते निर्दोष आहेत. धमकीच्या फोनशी त्यांचा काहीही संबंध नाही. तसेच त्यांना अडचणीत आणण्यासाठी कुणीतरी मुद्दामहून हे कारस्थान रचले असावे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तसेच धार्मिक गटात तेढ निर्माण केल्याबद्दल त्यांनी शाहरुख खानच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, अशीही आठवण सांगितली. १९९४ साली वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली होती. शाहरुख खान अंजाम चित्रपटात त्याच्या गाडीत हरणाचा मृतदेह असल्याचे आपल्या नोकराला सांगतात. या संवादावर फैजान खान यांनी आक्षेप घेतला होता.

इंडिया टुडेशी बोलताना फैजान खान म्हणाले की, माझा फोन चोरी झाला असून मी त्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. आज मुंबई पोलीस माझ्या घरी आले आणि माझी चौकशी सुरू केली. मी त्यांना म्हणालो की, मी वकील आहे आणि माझा फोन चोरी झाला असून त्यावरून कुणी कॉल केला मला कल्पना आहे. पोलिसांनी माझ्याकडे दोन तास चौकशी केली. तसेच जेव्हा शाहरुख खानला धमकीचा फोन केला गेला, तेव्हा मी न्यायालयात होतो, असेही फैजान खान यांनी सांगितले.

शाहरुख खान विरोधात तक्रार का दाखल केली?

शाहरुख खान विरोधात दाखल केलेल्या तक्रारीबद्दल फैजान खान म्हणाले की, बिश्नोई समाजातील अनेक लोक माझे मित्र आहेत. त्यांचे २९ तत्त्वे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ते हरणांना पवित्र मानतात, तसेच त्याची शिकार निषिद्ध मानतात. जर मुस्लीम व्यक्तीने चित्रपटात हरणाच्या शिकारीविषयी संवाद बोलला तर दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळेच या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी मी तक्रार दाखल केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी सांगितले की, शाहरुख खानला धमकी देणारा फोन करणाऱ्याने स्वतःला हिंदुस्तानी असल्याचे म्हटले होते.