मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (सीएसएमआयए) लंडन, टोरँटो, न्यूयाॅर्क येथे आंब्याची वाहतूक करण्यात आली. सीएसएमआयएने आंब्याच्या प्रमुख प्रजातींमधील हापूस, चौसा, केसर, बदामी नीलम या आंब्याची निर्यात केली. सीएसएमआयए येथे नाशवंत मालवाहतुकीच्या उत्तम हाताळणीमुळे आंब्याच्या निर्यातीमध्ये यावर्षी ९ टक्क्यांची वाढ झाली.

भारतातील नाशवंत वस्तूची सातासमुद्रापार वाहतूक करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने (सीएसएमआयए) प्रमुख भूमिका बजावली आहे. यावर्षी आंब्याच्या हंगामात सीएसएमआयएने भारतातील आंब्यांना जगभरात निर्यात करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. एप्रिल व मे २०२५ मध्ये विमानतळाने ३,६२४ मेट्रिक टन आंबा निर्यात केला. एप्रिल व मे २०२४ मध्ये ३,३१८ मेट्रिक टन आंबा निर्यात केला होता. तर, या दोन वर्षाच्या तुलनेत ९ टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे जागतिक व्यापारामध्ये विमानतळाची विस्ताराची भूमिका अधिक दृढ झाली आहे.

नाशवंत पदार्थांसाठी भारतातील प्रमुख हवाई कार्गो हब सीएसएमआयएने हापूस, चौसा, केसर, बदामी व नीलम अशा काही सर्वोत्तम आंब्यांची निर्यात केली आहे. ज्यामुळे जगभरात आंब्यांच्या मागणीची पूर्तता झाली. मुंबई विमानतळावरून सर्वाधिक निर्यात ही लंडन येथे झाली. त्यानंतर टोरँटो आणि न्यूयाॅर्क येथे झाली.

या हंगामात भारतातील आंब्यांच्या निर्यातीत झालेल्या वाढीमधून देशातील कृषी सर्वोत्तम निदर्शनास येते. आंब्यांच्या विविध प्रजातींना जागतिक मागणी वाढल्याने, भारतातील शेतकऱ्यांना फायदा होतो. तसेच, प्रत्येक विमान फेरीद्वारे आंब्याच्या निर्यातीत जागतिक आघाडीवर भारताचे स्थान मजबूत करण्यात सीएसएमआयए महत्त्वाची भूमिका बजावते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतातील प्रमुख आंब्यांना जागतिक बाजारपेठांमध्ये निर्यात करण्यासाठी सीएसएमआयएमध्ये सुविधा असल्याचा अभिमान आहे. जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि प्रगत शीतप्रणाली असल्याने, निर्यात केले जाणारे आंबे ताजे राहण्याची खात्री सीएसएमआयए देते. आंब्यांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी आणि खराब होण्यापासून रोखण्यासाठी वाहतुकीदरम्यान तापमान १५ अंश सेल्सिअस आणि २५ अंश सेल्सिअस दरम्यान नियंत्रित केले जाते. उष्णतेचा संपर्क कमी करण्यासाठी आणि आर्द्रता पातळी कायम राखली जाते. त्यामुळे आंबे अधिक ताजी राहतात आणि त्यांची गुणवत्ता देखील वाढते, असे सीएसएमआयएच्या प्रवक्त्यांनी सांगितले.