मुंबई महानगरात सोमवारपासून काळ्या-पिवळ्या रिक्षा, टॅक्सींसाठी नवीन भाडेदर लागू झाले. परंतु नवीन भाडेदरासाठी मीटरमध्ये बदल करण्यास दिलेली तीन महिन्यांची मुदत आणि अद्याप चालकांच्या हाती नवे दरपत्रकच न मिळाल्याने पहिल्या दिवशी प्रवाशांनी जुन्या भाडेदरानेच प्रवास केला. प्रवासी कमी मिळत असल्याने भाडेवाढ होऊनही ती घेण्यास चालकांनी तयारी दर्शवली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या पाच वर्षांत रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा दोन्ही सेवांसाठी किमान तीन रुपये भाडेवाढ करण्यात आली आहे. यात रिक्षाचे सुरुवातीचे दीड किलोमीटरचे भाडे १८ रुपयांवरून २१ रुपये आणि टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरून २५ रुपये करण्यात आले आहे. तर रात्रीच्या भाडेदरातही बदल झाले आहेत. नवीन भाडेदरासाठी चालकांना मीटरमध्ये बदल (रिकॅ लिब्रेशन) करावे लागणार असून त्यासाठी मे महिन्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत नवीन भाडय़ाची आकारणी दरपत्रकानुसार करण्यात येणार आहे. हे दरपत्रक चालकांना परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येईल किं वा रिक्षा, टॅक्सी संघटनांकडून त्याची छापील प्रत मिळेल. त्यावर परिवहनचे बारकोड आवश्यक आहे.

परंतु सोमवारी अनेक चालकांकडे नव्या भाडय़ाचे दरपत्रकच नव्हते. त्यामुळे प्रवासी रिक्षात बसल्यानंतर जुन्या मीटरप्रमाणेच भाडे आकारणी होत होती. प्रवासी रिक्षात बसल्यानंतर भाडेवाढ झाली असून त्यानुसार आकारणी करणार की जुन्या मीटरप्रमाणेच अशी विचारणाही चालकांकडे करीत होते. हातात दरपत्रक नसल्याने जुन्या मीटरप्रमाणे आकारणी होईल, असे सांगितल्याने अनेक प्रवासीही निवांत होत होते. काही चालकांना भाडेवाढ झाल्याची माहितीही नाही. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून ते नेहमीप्रमाणे भाडे आकारणी करीत होते. संघटनांकडून दरपत्रक मिळाले नाही, भाडेवाढ झाल्याचे कु णीही सांगितले नाही, रिकॅ लिब्रेशनसाठी मुदत आहे अशी अनेक कारणे चालकांकडून पहिल्याच दिवशी पुढे के ली जात होती. अनेक चालकाकडे स्मार्टफोन नसल्याने संके तस्थळ व वॉट्सअ‍ॅपद्वारे दरपत्रक मिळणार कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मीटरबदल करण्यासाठी वेळा

मीटरमध्ये बदल करण्यासाठी (रिकॅ लिब्रेशन) एक चीप बसवावी लागेल. तसेच त्याची दुरुस्तीही करावी लागणार असून आरटीओत मीटर पासही करावे लागणार आहे. यासाठी ७०० ते ८०० रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. मीटरबदल १ मार्चपासून होणार असून वाहन नोंदणी क्रमांकाच्या शेवटच्या क्रमांकानुसार मीटर बदलाचे काम केले जाणार आहे. यासाठी १ ते ७ मार्चपर्यंत शून्य, ८ मार्च ते १४ मार्चपर्यंत १ क्र मांक अशा पद्धतीने वेळ देण्यात आली आहे.

परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर दरपत्रक उपलब्ध आहे. ते चालक डाऊनलोड करू शकतात. परिवहनकडून मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे दरपत्रक पाठवण्यात आले असून ते चालकांनाही उपलब्ध केले जात आहे. चालकांना मीटर रिकॅ लिब्रेशन करणे गरजेचे आहे.

– ए. एल. क्वाड्रोस, महासचिव, मुंबई टॅक्सीमेन्स युनियन

मी कु लाबा परिसरात टॅक्सी चालवतो. करोनामुळे प्रवासी पूर्वीसारखे मिळत नाही. त्यात आता भाडेवाढ करण्यात आली आहे. भाडेवाढ झाली असली तरीही आम्हाला नवीन दरपत्रक मिळालेले नाही. ते कु ठून मिळणार त्याचीही माहिती कु णी दिलेली नाही. नवीन भाडेदरासाठी मीटरमध्ये बदल करावे लागणार असून त्यासाठी किती खर्च येणार याचीही माहिती नाही.

– शिवप्रसाद पांडे, टॅक्सीचालक

मुळातच भाडेवाढ रिक्षा, टॅक्सीचालकांना मान्य नाही. परंतु सरकारने भाडेवाढ केल्याने नवीन भाडे घेण्याशिवाय पर्याय नाही. कारण यामुळे प्रवासी प्रवास नाकारण्याचीच भीती अधिक आहे. चालकांना संघटनांकडून नवीन दरपत्रक उपलब्ध केले जात आहे. त्यांना मीटर रिकॅ लिब्रेशनही करण्याच्या सूचना केल्या आहेत.

– शशांक राव, अध्यक्ष, मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियन

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many rickshaw and taxi drivers do not have a new tariff abn
First published on: 02-03-2021 at 00:54 IST