मुंबई: आवाज मराठीचा म्हणत राज ठाकरे व उद्धव ठाकरे बंधूंनी वरळी डोम येथे बोलावलेल्या मराठी माणसाने वरळी गावातील आस्तिक ब्रास ब्रँड पथकाच्या संगीतावर एकच जल्लोष केला.

राज्य सरकारने लागू केलेल्या हिंदी सक्तीचा शासन आदेश रद्द केल्यानंतर ठाकरे पक्ष आणि मनसे पक्षाने आयोजित केलेल्या विजयी मेळाव्याला सर्व पक्षीय मराठी माणसाने प्रचंड गर्दी केली.

वरळी डोम बैठकची क्षमता आठ हजार श्रोत्यांची आहे मात्र या कार्यक्रमाला त्याहीपेक्षा चार पाच हजार कार्यकर्त्यांची गर्दी सभागृह बाहेर होती. मुख्य कार्यक्रम सुरू होण्या अगोदर वरळी गावातील ब्रास ब्रँडने कार्यक्रमात जाण आणली.

ये जा दांड्यावरी, एकवीरा आई, जय जय महाराष्ट, प्रिय आमुचा महाराष्ट्र सारख्या  गाण्यांवर सर्वांनी ठेका धरला. आवाज मराठीचा म्हणत राज ठाकरे व उद्धव ठाकरे बंधूंनी वरळी डोम येथे बोलावलेल्या मराठी माणसाने वरळी गावातील आस्तिक ब्रास ब्रँड पथकाच्या संगीतावर एकच जल्लोष केला.

राज्य सरकारने लागू केलेल्या हिंदी सक्तीचा शासन आदेश रद्द केल्यानंतर ठाकरे पक्ष आणि मनसे पक्षाने आयोजित केलेल्या विजयी मेळाव्याला सर्व पक्षीय मराठी माणसाने प्रचंड गर्दी केली. वरळी डोम बैठकची क्षमता आठ हजार श्रोत्यांची आहे मात्र या कार्यक्रमाला त्याहीपेक्षा चार पाच हजार कार्यकर्त्यांची गर्दी सभागृह बाहेर होती. मुख्य कार्यक्रम सुरू होण्या अगोदर वरळी गावातील ब्रास ब्रँडने कार्यक्रमात जाण आणली. ये जा दांड्यावरी, एकवीरा आई, जय जय महाराष्ट, प्रिय आमुचा महाराष्ट्र सारख्या गाण्यांवर सर्वांनी ठेका धरला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची बरोबर बारा वाजता व्यासपीठावर आगमन झाले. हा प्रवेश नेत्रदीपक होता. व्यासपीठाच्या दोन बाजूच्या विंगेत तून या दोन भावांचा एकाच वेळी प्रवेश झाला. त्यावेळी सभागृहातील दिवे बंद करण्यात आले होते. सर्व मराठी जणांनी उत्स्फूर्त मोबाईल ची टॉर्च लावली. त्यामुळे अंधारात प्रत्येकाच्या हातात एक दिवा दिसत होता. एखादा चित्रपटाच्या प्रीमियर शो वेळी केला जाणारा प्रवेश सोहळा या निमित्ताने दिसून आला. व्यासपीठावर दोनच खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड , माकप डॉ अजित नवले भाकप प्रकाश रेड्डी शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते