scorecardresearch

मेधा सोमय्या तक्रारप्रकरण : खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नोव्हेंबरपासून खटला?

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी केलेल्या मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर १ नोव्हेंबरपासून खटला चालवण्यात येण्याची शक्यता आहे.

मेधा सोमय्या तक्रारप्रकरण : खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नोव्हेंबरपासून खटला?
शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी केलेल्या मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर १ नोव्हेंबरपासून खटला चालवण्यात येण्याची शक्यता आहे.

मेधा यांनी केलेले आरोप आपल्याला मान्य नाहीत, असे राऊत यांनी मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाला सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शिवडी न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी १ नोव्हेंबरपासून राऊत यांच्या विरोधातील खटला सुरू करण्याचे संकेत महानगरदंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी दिले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या