मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक

अप आणि डाउन मार्गावरील गाड्या विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकांवर थांबणार नाहीत.

(संग्रहित छायाचित्र)

देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप व डाउन धिम्या मार्गावर रविवारी (१८ एप्रिल) मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाउन हार्बर मार्गावरही ब्लॉक घेतला जाणार असून पायाभूत सुविधा व देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.

* मध्य रेल्वे

कधी : रविवारी, १८ एप्रिल, स. ११ ते दु. ४ वा.

कुठे : माटुंगा ते मुलुंड धिम्या मार्गावर

परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून सुटणाऱ्या धिम्या मार्गावरील गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील गाड्या मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. अप आणि डाउन मार्गावरील गाड्या विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकांवर थांबणार नाहीत.

* हार्बर रेल्वे

कधी : रविवारी, १८ एप्रिल, स. ११.१० ते सायं. ४.१० वा.

कुठे : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाउन हार्बर मार्गावर

परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून वाशी, बेलापूर, पनवेलकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल गाड्या रद्द राहातील. तसेच ब्लॉक कालावधीत छत्रपती

शिवाजी महाराज टर्मिनसहून वांद्रे, गोरेगावकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावरील सेवा बंद राहातील.

ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला स्थानकादरम्यान विशेष लोकल गाड्या चालवण्यात येतील.

* पश्चिम रेल्वे

कधी : रविवारी, १८ एप्रिल, स. १० ते दु. ४

कुठे : माहीम ते अंधेरी हार्बर लाईन अप आणि डाउन धिम्या मार्गावर

परिणाम : ब्लॉक चर्चगेट ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावरील काही लोकल गाड्या रद्द केल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mega block tomorrow on central railway abn

ताज्या बातम्या