कुलदीप घायवट

मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

कुठे : माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन धीमा मार्ग

कधी : रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत माटुंगा ते ठाण्यादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे या वेळेत नाहूर, कांजूरमार्ग, विद्याविहार या स्थानकांत लोकल सेवा उपलब्ध नसेल.

हेही वाचा >>>अभिषेक घोसाळकरांचं पार्थिव पाहून वडिलांनी फोडला टाहो! पत्नी आणि मुलीचं रडणं मन हेलावून टाकणारं

हार्बर मार्ग

कुठे : पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर

कधी : रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल, पनवेल ते ठाणे लोकल सेवा बंद असेल. तर, सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ठाणे ते वाशी/नेरूळ, बेलापूर/नेरूळ ते उरण दरम्यान लोकल सेवा सुरू असेल.

पश्चिम रेल्वे

कुठे : सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. यावेळी काही लोकल रद्द करण्यात येतील.