महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात ‘म्हाडा’च्या वांद्रे (पूर्व) येथील गृहनिर्माण भवन या मुख्यालयात १ एप्रिलपासून अभ्यागताना दुपारी २ ते ५ या वेळेतच प्रवेश देण्यात येणार आहे. कामकाजात सुसूत्रता यावी आणि गृहनिर्माण भवनातील अनावश्यक लोकांच्या प्रवेशावर नियंत्रण यावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अभ्यागतांबरोबरच ‘म्हाडा’तील अधिकारी व कर्मचारी यांनाही भवनात प्रवेश करताना सुरक्षा रक्षकांना ओळखपत्र दाखविणे सक्तीचे करण्यात आले असल्याची माहिती ‘म्हाडा’च्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.