मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या रखडलेल्या ४,०८२ घरांच्या सोडतीला १४ ऑगस्टचा मुहूर्त मिळाला असून मंडळाने नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> न्यायव्यवस्था म्हणजे गंमत वाटली का? न्यायालयाकडून राणा दाम्पत्याची कानउघडणी, नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील घरांसाठी तब्बल चार वर्षांनंतर सोडत काढण्यात येत असून ४,०८२ घरांसाठी अर्जदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या सोडतीत तब्बल एक लाख २० हजार १४४ अर्जदार सहभागी होणार आहेत. दरम्यान, या सोडतीचा निकाल रखडला होता. मुख्यमंत्र्यांकडून वेळ मिळत नसल्याने सोडत सोहळ्याची तारीख जाहीर होत नव्हती. मात्र शेवटी बुधवारी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन १४ ऑगस्टचा मुहूर्त निश्चित केला आहे. यासंबंधीची घोषणा त्यांनी बुधवारी केली. पण १४ ऑगस्ट रोजी वांद्रे येथील रंगशारदा सभागृह उपलब्ध नसल्याने सोडत सोहळ्याच्या स्थळाबाबत अनिश्चितता होती. अखेर नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा >>> उच्च न्यायालयाची पुरातत्व वारसा लाभलेली इमारत जपायला हवी- मुख्य न्यायमूर्तींची टिप्पणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सकाळी ११.३० वाजता सोडतीला सुरुवात होणार असून मुंबई मंडळ सध्या सोडतीच्या तयारीत व्यस्त आहे. मुंबई मंडळाने संगणकीय सोडतीला २००८ मध्ये सुरुवात केली असून २०१३ नंतर सोडतपूर्व प्रक्रिया पूर्णत ऑनलाईन करण्यात आली. आता २०२३ मध्ये सोडतीची संपूर्ण प्रक्रिया अर्थात जाहिरातीपासून घराचा ताबा देण्यापर्यंतची प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. या नव्या संगणकीय प्रणालीद्वारे काढली जाणारी ही मुंबई मंडळाची पहिली सोडत आहे. तर २००८ पासून २०१९ पर्यंतच्या सोडतीपैकी एका सोडतीचा अपवाद वगळता सर्व सोडती रंगशारदा सभागृहातच काढण्यात आल्या आहेत. एक सोडत ही म्हाडा भवनात काढण्यात आली होती. आता पहिल्यांदा रंगशारदा वा म्हाडा भवनाबाहेर सोडत सोहळा होणार आहे.