मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांच्या सोडतीतील प्रतीक्षायादीवरील ३१२ विजेत्यांना मुंबई मंडळाकडून एक संधी देण्यात आली आहे. या ३१२ विजेत्यांना स्वीकृती पत्र सादर करण्याकरिता देण्यात आलेली मुदत संपली आहे. या मुदतीत प्रतीक्षायादीवरील काही विजेत्यांनी अद्याप स्वीकृती पत्र सादर केलेले नाही. त्यामुळे त्यांना एक संधी म्हणून मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
हेही वाचा – मुंबै बँकेसाठी भाजपच्या मंत्र्यांचा आग्रह;अडवणूक केली जात असल्याचा आरोप
हेही वाचा – “सरकारवर सत्तेच्या नशेचा अंमल ‘कुत्ता गोली’प्रमाणे…”; ठाकरे गटाचा हल्लाबोल
मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांसाठी १४ ऑगस्टला सोडत पार पडली. या सोडतीतील ४०० हुन अधिक विजेत्यांनी घरे परत (सरेंडर) केली आहेत. तर ७० विजेत्यांनी स्वीकृती पत्र सादर केलेले नसून काही विजेत्यांबाबत आक्षेप असल्याने त्याबाबत चौकशी सुरू आहे. याअनुषंगाने ३५१५ विजेत्यांना तात्पुरते देकार पत्र वितरित करून त्यांच्याकडून रक्कम भरून घेणे, १०० टक्के रक्कम भरणाऱ्यांना ताबा देणे अशी प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान मंडळाने परत करण्यात आलेल्या घरांसाठी प्रतीक्षायादीवरील विजेत्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला असून प्रतीक्षायादीवरील ३१२ विजेत्यांना स्वीकृती पत्र वितरित करण्यात आले होते. स्वीकृती पत्र सादर करण्याची मुदत नुकतीच संपली आहे. पण अद्याप काही जणांनी स्वीकृती पत्र सादर केलेले नाही. अशावेळी घरे रिकामी राहू नयेत म्हणून स्वीकृती पत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच यासाठी मुदतवाढ दिली जाणार असल्याची माहिती मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.