मुंबई : पाच वर्षांपूर्वी पूर्व उपनगरांत तरूणाने बलात्कार केल्यामुळे एक अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. न्यायालयाने या आरोपीला नुकताच दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
पीडित मुलगी पूर्व उपनगरात वास्तव्यास असून आरोपी याच परिसरातील राहणारा आहे. आरोपीने २०२१ मध्ये या मुलीला निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिच्या आईच्या ही बाब समजली. त्यानुसार तिने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पोस्को आंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
गेल्या पाच वर्षांपासून आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. याचदरम्यान पोलिसांनी या आरोपीला शिक्षा होण्यासाठी काही दिवसांपूर्वी न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. सत्र न्यायालयाने या प्रकरणी सुनावनी घेतली. आरोपीविरोधात दोषारोप सिद्ध झाले. त्यानुसार न्यायालयाने या आरोपीला दहा वर्षे सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.