दादरच्या शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शुक्रवारी पहिला ‘गुढीपाडवा मेळावा’ झाला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप, मोदी आणि शहा यांच्यावर चौफेर टीका केली. राज्याचे तुकडे करण्याची भाषा करणाऱयांनो तुकडे करून वाटून घ्यायला महाराष्ट्र म्हणजे केक वाटला का? असा खोचक सवाल राज यांनी यावेळी उपस्थित केला. विदर्भातील अनेक नेते आज केंद्रात आणि राज्यात मंत्री आहेत. मग सत्ता हातात असूनही विदर्भाची प्रगती होत नसेल तर त्यात महाराष्ट्राचा दोष काय? झेपत नसेल तर सत्ता सोडा पण महाराष्ट्राचे तुकडे करु देणार नाही, असा एल्गार राज यांनी यावेळी केला. तासाभराच्या भाषणात राज यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला.
एकही आंदोलन अर्धवट सोडलेले नाही
मी हाती घेतलेली आंदोलने अर्धवट सोडली गेली, असा आरोप प्रत्येकवेळी केला गेला. पण अर्धवट सोडलेले एकतरी आंदोलन मला दाखवून द्यावे. मी आजवर जी आंदोलनं केली ती पूर्ण केली, असे ठाम मत राज यांनी सभेत व्यक्त केले. दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आंदोलन असो वा टोलचे मनसेने केलेली आंदोलने पूर्णपणे यशस्वी झाली. टोलविरोधातल्या आंदोलनामुळे आज सरकारला राज्यातील सर्व अनधिकृत टोल बंद करावे लागले, हे आंदोलनाचे यश नाही का? असा सवाल राज यांनी उपस्थित केला.
अमित शहा सुटले, मग राम मंदिर कोर्टात का अडकले?
राम मंदिराबाबत कोर्टात अद्याप केस सुरू आहे. ज्या राम मंदिराचे स्वप्न दाखवून मोदी सत्तेत आले. मग राम मंदिराचं काय झालं? याला अर्धवट आंदोलन सोडणे असे म्हणतात, असा टोला राज यांनी लगावला. राम मंदिराचा विषय निघाला की कोर्टात केस सुरू असल्याचे उत्तर दिले जाते. मग अमित शहा जर कोर्टातून सुटू शकतात, तर राम मंदिरचा प्रश्न अजूनही कोर्टात का? असा सवाल राज यांनी उपस्थित केला.
सत्तेत असूनही शिवसेना आम्हाला घाबरते
शिवाजी पार्कवर सभा घेणार हे माहित झाल्यानंतर सेनेला पोटशूळ झाला. राज्यात सत्ता यांची तरीही हे आम्हाला घाबरतात. पटत नसेल तर सत्तेतून बाहेर पडा, असे राज म्हणाले
‘भारत माता की जय’चा वाद मुद्दाम उकरून काढला
देश प्रेमाची प्रमाणपत्र काय फक्त संघ वाटणार का? ‘भारत माता की जय’ घोषणा इंदिरा गांधींच्या काळापासून मी ऐकत आलो आहे. इंदिरा गांधी त्यांचे भाषण संपल्यानंतर भारत माता की जय च्या घोषणा देत असत. भारत माता की जय ही घोषणा काही रोज दिली जात नाही. त्यामुळे हा वाद मुद्दाम उकरून काढला गेला, असा आरोप राज यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणेवरून सुरू झालेल्या वादाबाबत केलेल्या वक्तव्यावरही राज बरसले. तुम्हाला मुख्यमंत्रीपदावरून कोण काढतयं? असा सवाल करत राज यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांची नक्कल करत देवेंद्र फडणवीस म्हणजे वर्गातील मॉनिटर असल्याचे म्हटले.
जे काँग्रेसच्या राज्यात, तेच मोदींच्या राज्यात
काँग्रेस सरकारच्या काळात देशात जी परिस्थिती होती, तीच परिस्थिती मोदींच्या राज्यातही आले. उलट त्याहून परिस्थिती आणखी खालावत चालली आहे. मोदींकडून लोकांना खूप आशा होत्या. पण पंतप्रधान झाल्यानंतर नुसत्या घोषणांचा पाऊस आणि जनतेच्या हातात मात्र काहीच पडत नसेल, तर ती सत्ता काय कामाची? आजही राज्यासह देशात शेतकऱयांच्या आत्महत्या होतच असतील मग त्यांच्यात आणि यांच्यात फरक तो काय? असा सवाल राज यांनी सत्ताधाऱयांना विचारला.
LIVE UPDATES:
LIVE: शिवाजी पार्क परिसरात लावलेले #मनसे चे झेंडे जाताना काढून नेण्याचं #राजठाकरे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. https://t.co/Y0TT46w2Vl
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
LIVE: डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचं #राजठाकरेंचं आवाहन. https://t.co/Y0TT46w2Vl
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
LIVE: ज्याच्यावर विश्वास ठेवला तेच गळे कापायला निघालेय. म्हणून हा #राजठाकरे नरेंद्र मोदींविरोधात बोलायला लागला. https://t.co/Y0TT46w2Vl
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
LIVE: अनधिकृत इमारती बांधणा-या बिल्डरांना शिक्षा करा आणि लोकांना मदत करा. – #राजठाकरे https://t.co/Y0TT46w2Vl @LoksattaLive
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
LIVE: काश्मीरमध्ये पीडीपीसोबत युती करून राष्ट्रवादाची ढोंगं का करता? #राजठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल. https://t.co/Y0TT46w2Vl
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
LIVE: अनधिकृत इमारती बांधणा-या बिल्डरांना शिक्षा करा आणि लोकांना मदत करा. – #राजठाकरे https://t.co/Y0TT46NDMT @LoksattaLive
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
LIVE: मुंबईत अमराठी वाढत आहेत. – #राजठाकरे https://t.co/Y0TT46NDMT @LoksattaLive
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
LIVE: पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. – #राजठाकरे https://t.co/Y0TT46w2Vl @LoksattaLive
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
LIVE: #राजठाकरे यांच्याकडून विदर्भातील आजवरच्या राज्य आणि केंद्रीय मंत्र्यांच्या यादीचे वाचन. https://t.co/Y0TT46w2Vl @LoksattaLive
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
LIVE: महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा करणे म्हणजे आई आणि मुलाची ताटातूट करणे. – #राजठाकरे https://t.co/Y0TT46w2Vl @LoksattaLive
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
LIVE: झेपत नसेल तर सत्ता सोडा पण महाराष्ट्र तोडू देणार नाही. – #राजठाकरे https://t.co/Y0TT46w2Vl @LoksattaLive
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
LIVE: आजची परिस्थिती कायम राहिली तर 2050 पर्यंत मराठवाड्याचं वाळवंट होईल, असं एक संशोधन सांगतं. – #राजठाकरे https://t.co/Y0TT46w2Vl
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
LIVE: वेगळया विदर्भाची मागणी करणा-या मा.गो.वैद्य आणि अणेंना # राजठाकरे यांचा टोला. https://t.co/Y0TT46w2Vl @LoksattaLive
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
LIVE: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आजवर हाती घेतलेलं कुठलंच आंदोलन अर्धवट सोडलेलं नाही. – #राजठाकरे #मनसे @LoksattaLive
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
LIVE: मराठी पाट्या, रेल्वेमध्ये मराठी नोकरभरती, मोबाइलवर मराठी,टोल बंद ही सर्व आंदोलने #मनसे ने यशस्वी केली आहेत. – #राजठाकरे @LoksattaLive

LIVE: अमित शाह जर कोर्टातून सुटतो तर मग राम मंदिरचा प्रश्न न्यायालयात सुटत का नाही? – #राजठाकरे #मनसे @LoksattaLive https://t.co/Y0TT46w2Vl
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
LIVE: नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान व्हावेत, हे या देशात मीच पहिल्यांदा बोललो. – # राजठाकरे https://t.co/Y0TT46w2Vl
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
LIVE: आजची वर्तमानपत्रे आणि चँनल यांच्यामध्ये फूट पडलेली आहे. – #राजठाकरे #मनसे @LoksattaLive
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
LIVE: होम ग्राऊंडवर खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल खेळायला सुरूवात करतो. – #राजठाकरे #मनसे @LoksattaLive
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
LIVE: अशोक मुर्तडक, शिशिर शिंदे, बाळा नांदगावकर यांच्यासह पक्षाचेे प्रमुख नेते मंचावर उपस्थित. #राजठाकरे #मनसे https://t.co/Y0TT46w2Vl
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
#मनसे कार्यकर्त्यांचं शिवाजी पार्कवर जोरदार शक्तीप्रदर्शन. #राजठाकरे @mnsadhikrut @LoksattaLive pic.twitter.com/TcpnK4tPci
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
#मनसे च्या शिवाजी पार्क येथील सभेच्या मुख्य रंगमंचाच्या मध्यभागी मोठी गुढी. #राजठाकरे #गुढीपाडवा @LoksattaLive pic.twitter.com/Q6jjqmIwBq
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
शिवाजी पार्क परिसरात आवाजाची तिव्रता मोजताना सामाजिक कार्यकर्त्या. #राजठाकरे #मनसे @LoksattaLive pic.twitter.com/cSKz7YGyMs
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
शिवाजी पार्क परिसरात #मनसे कार्यकर्त्यांचे आगमन होण्यास सुरूवात. #राजठाकरे @LoksattaLive pic.twitter.com/mQGKlGk63x
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवाजी पार्क येथील सभेसाठी पोलीसांची चोख सुरक्षा व्यवस्था. #राजठाकरे @LoksattaLive pic.twitter.com/NDFykZ6oBT
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवाजी पार्क येथील सभेसाठी उभारलेला रंगमंच. #मनसे #राजठाकरे @mnsadhikrut @LoksattaLive pic.twitter.com/HFu7SBIUYJ
— LoksattaLive (@LoksattaLive) April 8, 2016
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.