मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या चार वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये गणेशोत्सवानिमित्त इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम काॅर्पोरेशन (आयआरसीटीसी) कडून प्रवाशांना मोदक देण्यात आले. यावेळी वंदे भारतमधील सुमारे दोन हजार प्रवाशांनी मोदकांचा आस्वाद घेतला.

मध्य रेल्वेवरून सीएसएमटी-शिर्डी, सीएसएमटी-सोलापूर, सीएसएमटी-मडगाव आणि पश्चिम रेल्वेवरून मुंबई सेंट्रल-गांधीधाम या चार वंदे भारतमध्ये नियोजित जेवणात मोदक देखील ठेवले होते. गणेशोत्सव काळात प्रवाशांना मोदक देऊन, वंदे भारतमध्ये गणेशोत्सव साजरा केला.

हेही वाचा – मुंबई : महानगरपालिकेच्या अमृत कलश यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हेही वाचा – मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मध्य रेल्वेवर विशेष लोकल धावणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक २०९०१ मुंबई सेंट्रल-गांधीनगरमधील ७०५ प्रवासी, गाडी क्रमांक २२२२३ सीएसएमटी-शिर्डीमधील ७९६ प्रवासी, गाडी क्रमांक २२२३० सीएसएमटी मडगाव ३०५ प्रवासी, गाडी क्रमांक २२२२५ सीएसएमटी-सोलापूरमधील १०१ प्रवाशांना अशा एकूण १,९०७ प्रवाशांना मोदक देण्यात आले.