मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आरडब्ल्यूवाय ९/२७ आणि आरडब्ल्यूवाय १४/३२ या दोन धावपट्ट्यांची पावसाळ्यानंतरची वार्षिक देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यासाठी विमानतळ प्रशासनातर्फे गुरुवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या सहा तासांच्या कालावधीत वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली होती. देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यांनतर वाहतूक सेवा पूर्ववत करण्यात आली.

हे ही वाचा…उंदरांना पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोंदपट्ट्यांवरील बंदी रद्द करा, उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरवर्षी पावसाळ्यानंतर विमानतळाच्या धावपट्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीची कामे केली जातात. अनेकदा मुसळधार पावसामुळे धावपट्ट्यांची काही प्रमाणात झीज होते. यामुळे वाहतूक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने धावपट्यांची नियमितपणे देखभाल करणे गरजेचे असते. विमानतळ प्रशासनाला यासंदर्भात सहा महिन्यांपूर्वीच ‘नोटीस टू एअरमन’जारी करण्यात आली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनातर्फे गुरुवारी सहा तासांच्या कालावधीत देखभालीसंदर्भातील विविध कामे पूर्ण करण्यात आली.