मुंबई : अनंत चतुर्दशी दिवशी गुरुवारी २८ सप्टेंबर रोजी समुद्रात सकाळी ११ वाजता भरती, सायंकाळी ५.०८ वाजता ओहोटी, रात्री ११.२४ वाजता भरती असेल. यानंतर, दिनांक २९ सप्टेंबर रोजी पहाटे ५.१५ मिनिटांनी ओहोटी, सकाळी ११.३७ वाजता ४.७१ भरती असेल. गुरुवारी २८ सप्टेंबर रोजी समुद्रात सकाळी ११ वाजता भरतीच्या वेळी ४.५६ मीटर उंचीच्या लाटा येतील. रात्री ११.२४ वाजता भरतीच्या वेळी ४.४८ मीटर उंचीच्या लाटा उसळतील.
हेही वाचा : “मुंबईत मराठी महिलेला घर नाकारलं जाणं ही बाब…”, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांनी घेतली घटनेची दखल
त्यामुळे यावेळी भक्तांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. या भरती तसेच ओहोटीदरम्यान विसर्जनासाठी चौपाट्यांवर येणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.