मुंबईच्या धारावी येथे पोलिसांनी रेहान खान (वय २९) नामक एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर पत्नीचा खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मृत पत्नी यशोदा खाटीक (वय २४) हीचा मृतदेह घरातच गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. यशोदाने धर्मांतर करावे यासाठी रेहान तिला मारझोड करत होता, असा आरोप पत्नीच्या कुटुंबियांनी केला आहे. मृत यशोदा खाटीक ही मध्य प्रदेशच्या कटनी जिल्ह्यातील रहिवासी होती. लग्नानंतर रेहान आणि यशोदा धारावी मधील एका चाळीत राहत होते.

यशोदाच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले की, दोघांनीही २०१८ साली पळून जाऊन लग्न केले होते. त्यानंतर यशोदाचे बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. रेहान तिचे नाव रुबीना ठेवण्यास जबरदस्ती करत होता. यशोदाने धर्मांतरास नकार दिल्यामुळे तिची हत्या करण्यात आली. रेहान व्यसनाधीन होता. दारुच्या नशेत तो यशोदाला मारहाण करायचा.

यशोदाच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस तपास करत आहेत. रेहानवर पत्नीच्या हत्येला आत्महत्येचे स्वरुप दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ३०२ अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिस आता पोस्टमार्टम अहवालाची प्रतिक्षा करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वीच यशोदाने आपल्या घरच्यांना पतीच्या त्रासाबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर काही दिवस बरे गेले. आरोपी पती दारुचे व्यसन करुन यशोदाला त्रास देत होता. धर्मांतराचा विषयही त्या दोघांच्या भांडणाचे कारण होते. कुटुंबियांनी सांगितले की, एके दिवशी आरोपी पतीने घरी मौलवीला आणून यशोदाचे नाव रुबीना असे ठेवले. यशोदा आत्महत्या करु शकत नाही. तिची हत्याच झाली असावी, असा थेट आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन त्यादिशेने तपास सुरु केला.