लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर फरार आरोपींच्या शोधासाठी केलेल्या प्रतिबंधक कारवाईत वसईमध्ये १२ वर्षांपूर्वी हत्या करून फरार झालेला एक आरोपी सापडला आहे. देवनाथ लाडक्या उराडे (३८) असे त्याचे नाव असून ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नुकतीच त्याला अटक केली. विला डबके, सदानंद करपट आणि देवनाथ उराडे यांनी सदानंद गरेल यांची कोयत्याने व सळईने मारहाण करून हत्या केली होती. या प्रकरणी विरार पोलिसांनी दोघांना अटक केली. मात्र देवनाथ उराडे फरार होता.

संतोष मानेचे फाशीच्या शिक्षेला आव्हान
मुंबई  : पुण्यात बेदरकारपणे एसटी बस चालवून नऊ जणांचा बळी घेतल्याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या संतोष माने याने  आपल्या मानसिक स्थितीची पुनर्तपासणी पुण्याबाहेरील मनोचिकित्सकाकडून करून घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली. आपल्यावर उपचार सुरू असल्याचा दावा करीत माने याने फाशीच्या शिक्षेला आव्हान दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.